महात्म्याच्या मर्यादा: गांधींवर पुनर्विचार


गांधीजींना
'महात्मा' म्हटले जाते. खरं तर, त्यांच्या कार्याची व्यख्या करताना त्यांना 'राष्ट्रपिता' असे ही म्हटले जाते. पण मला प्रश्न पडतोहे विशेषण आपण विचारपूर्वक दिले आहे का? की तो ही एक झापडबंद दृष्टिकोन आहे? का मी इतका गोंधळलोय? का असं वाटतंय की आपण जितक्या श्रद्धेने त्यांना पाहतो तितक्याच कठोरतेने त्यांची तपासणी व्हायला हवी? आज कोणी गांधींवर प्रश्न उचलला तर तो राष्ट्रद्रोही होणार हे नक्कीच. मग राष्ट्रभक्तीचा अर्थ म्हणजे प्रश्न विचारणे, असा होतो का? की कोणाचीही निंदा करणे असा होतो? नेमकी बरोबर बाजू कोणती असा देखील प्रश्न समोर येतो, आणि मग हे मायाजाल कधी संपतच नाही...

खरं म्हणायचं तर माझ्यासाठी गांधी हे महात्मा नाहीत, ते पुढारी आहेत, हे नक्कीच. पंरतु गांधी हे संत नसून ते एक राजकारणी होते हे सर्वजण नेहमीच विसरत असतात. म्हणूनच असा कोणी वक्तव्य केलं की तो माणूस हा वाईट असा ठसाच उमटवला जातो. त्यांना राष्ट्रपिता म्हणणं हे देखील किती बरोबर आहे हे सुद्धा वादग्रस्तच आहे. एखादा व्यक्ती स्वतःच्या देशापेक्षा कसा मोठा असू शकतो असा साहजिक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर येतो. बहुतेक त्याकरता पुढच्या जन्मात मुसोलिनी व्हावं लागत असणार असा एक अंदाजच बुआ! असे म्हटले जाते की सुभाषचंद्र बोस ह्यांनी त्यांना राष्ट्रपिता अशी पदवी दिली असून पुढे नेहरूंनी त्याला बळ दिले. मग बोस, असा एक धडाचीच नेता, ज्यांनी गांधींना अशी पदवी दिली, त्यांनी पुढे सहस्त्र संघर्षाचा मार्ग निवडला जो गांधींना मान्य न्हवता. बरं मग? पुढे काय? पुढे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोस ह्यांना बाजूला करण्यासाठी गांधींनी अप्रत्यक्ष दबाव टाकला. असं का? एकच विचारसरणी बरोबर असेल असं ठरवण्याचा हक्क गांधींना कोणी दिला? मग लोकतंत्र कुठे गेलं? हे फॅसिझम नाही का?

बरं महात्मा तर लांबच, एक माणूस म्हणून गांधी कसे होते तेही कोणाला माहिती नसेल, हे नक्कीच. गांधी कोणी म्हटलं की अहिंसा, सत्याग्रह, स्वराज, योग, राष्ट्रवाद हे शब्द पटकन समोर येतात. पण हे मुळातच श्री औरोबिंदो ह्यांचे थोर विचार आहेत, ज्याचा श्रेय गांधी ह्यांनाच लोकांना आज पर्यंत दिला. ही अशी गोष्ट आहे जी पटकन खपणार नाही परंतु सत्य आहे. औरोबिंदो ह्यांनी राजकारणी जीवनातून लवकरच सन्यास घेतला ज्याचा फायदा योगायोगाने गांधींना झाला, नाहीतर आज श्री औरोबिंदो हे स्वतंत्रता चळवळीचे नेता असते. तसेच आणखी अनेक थोर विचारवंत आहेत ज्यांच्या कडून गांधींनी त्यांचे विचार त्यांना ना श्रेया देता घेतले आहेत, आजच्या काळात ह्याला 'साहित्यिक चोरी' असे म्हटले जाते. ज्यां-जॅक रुसो ह्याकडून ग्राम स्वराज हा विचार आला असावा असा तर्क आहे. ह्या यादी मध्ये पुढे इमानुएल कांत, जॉर्ज विल्हेल्म फ़्रिएड्रिक हेगेल, कार्ल मार्क्स, इत्यादी हे सुद्धा आहेतच. बरं मंडळी, एखाद्या विचारांमधून प्रेरणाघेणे आणि त्या विचाराची चोरी करून ते आपले स्वनिर्मित विचार आहेत हे दाखवणे ह्या मध्ये फरक समजवायला नको, असे धरून मी पुढे जातो!


गांधींची
धर्मनिरपेक्ष भूमिका कशी आदर्शवादी होती ह्या बाबत खूप लोक वकिली करत असतात, त्यांनी कसा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला, वगैरे वगैरे. 1947 मध्ये भाषण देऊन त्यांनी फाळणीचा निषेद केला, हे बरोबरच की, पण मग हे कोणाचे धोरण होते ज्यामुळे हा परिणाम झाला? का आपण आजही मान्य नाही करत की त्यांची भूमिका वास्तवात अयशस्वी झाली? का आपण आजही खिलाफतच्या बाबतीत शांत बसतो, का केरळमध्ये झालेला नरसंहार आपण सारखे सारखे विसरत असतो? का आपण पाकिस्तान आणि बंगालमधून प्रेत्तांनी गच्चभरून परत येणाऱ्या ट्रेन विसरतो? तुम्ही गांधींच्या ऐकीबद्दल बोलता तर गांधीच्या पुढच्या वक्तव्यालासुद्धा समर्थन करा पाहू: "Hindus should not harbour anger against Muslims even if the latter wanted to destroy and kill us all. We should face death bravely. If Muslims established their rule after killing all Hindus, we would be ushering in a new India." राग आला? संकोच वाटायला सुरुवात झाली? नसेलही, पण अशा भाष्याला पाठिंबा देणारा एकतर वेडा किंवा हिटलरच बाबा...

गांधींबद्दल इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल काय म्हणतात ते पाहूया. "It is alarming and also nauseating to see Mr. Gandhi, a seditious middle temple lawyer, now posing as a fakir of a type well-known in the East, striding half-naked up the steps of vicegral palace..." ह्या भाष्याचाबद्दल मला सुद्धा राग आहेच की पण चर्चिल होताच मुळात फटकळ. आता गंमत अशी की चर्चिलचे आजही खूप वाह वाह होत असते पण त्याला कोणीही दोषी ठरवत नाही. तुम्हाला माहित नसेल सुद्धा, पण ह्या माणसामुळे जवळजवळ 40 लाख लोक भूकमारीने 1941 मध्ये स्वर्गवासी झाले आहेत, तेही बंगालमध्ये, आणि आपण भारताचे लोक ह्यांना विसरून 60 लाख यहुदी लोकांसाठी रडत रडत हिटलरची नेहमी निंदा करत असतो. बरं, ह्याच चर्चिलने एकदा लॉर्ड लिनलिथगोवला पत्राद्वारे गांधींच्या उपोषणाबाबत विचारला होतं ते कसं ते सुद्धा बघा: "I have heard that Gandhi usually has glucose in his water when doing his fasting antics. Would it be possible to verify this?"

करमचंद गांधींच्या निधनाची गोष्ट नाहीच सांगितली तर बरे बुआकामुकसुख माणसाला कुठे न्हेऊन सोडते ह्याचीच एक छोटीशी गोष्ट ती. परत, मनू गांधी प्रकरणाबाबत सुद्धा मला काही बोलायचे नाही. गांधी आणि त्यांचा प्रसिद्ध ब्रह्मचार्य, हा मुद्दासुद्धा आपण वगळत आहोत. गांधी हा एक जुन्या विचारांचा नेता, म्हणे रेल्वे हे सैतान आहे आणि ते माणसाला देवापासून लांब न्हंयचे काम करते. असो, कस्तुरबा गांधी खूप आजारी असताना डॉक्टरने त्यांना पेनिसिलीन देण्याचे ठरवले होते, पण गांधींनी त्याला साफ मनाई केली. ते म्हणाले की माझ्या प्रार्थना जेव्हा तिचं डोकं माझ्यामांडीवर असेल ते काम करतील, ही पेनिसिलीन नाही. ह्याचा निष्कर्ष असा की बा स्वर्गवासी झाल्या. वर त्यांचा एक प्रसिद्ध वक्तव्य असं की भारताचे सदन हे काही नसून एक बाजारबसवी संस्था आहे. अजून किती उदारहणे द्यायचे हा एक प्रश्नच की..

गांधींचे विचार आदर्शवादी होते, पण त्यांची अंमलबजावणी कठीण होती. त्यांनी खाडीला उत्तेजन दिलं, पण आज भारताचा वस्त्रोद्योग जागतिक बाजारपेठेत टिकाव धरू शकतो का? त्यांचे जीवनशैली, स्वछता, साधेपणा ह्याचे महत्व नक्कीच आहे, पण हेच पुरेसे असते का? आजच्या गतिमान जगात त्यांच्या विचारांवर अवलंबून राहिलो तर आपण प्रगती करू शकतो का? गांधींची प्रतिमा पूजली जाते, पण त्यांच्यावर टीका करण्याचा अधिकारही आपल्या लोकशाहीत आहे. सत्य हे आहे की, गांधींनी क्रांतिकारीकरांचा विश्वासघात केला, बोस ह्यांना संपवलं, फाळणीस होकार दिला आणि हिंदूंवर अन्याय केला. माझ्यासाठी खरे राष्ट्रनायक हे आंबेडकर आणि सावरकर आहेत, गांधी नाही! आता वेळ आली आहे की, आपण सत्याचा स्वीकार करू आणि खऱ्या इतिहासाला ओळखू. इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय भविष्य उभारता येत नाही. गांधींना नव्याने पाहायला हवं. त्यांच्या चुकांवर चर्चा व्हायला हवी. अन्यथा आपण पुन्हा एकदा चूक करणार.

Comments

  1. एवढा वादग्रस्त blog नाही लिहायचा Vishwarth

    ReplyDelete
  2. Opinion formulation is good..lage raho

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The Great Deception of Existence: Exploring Nihilism & The Paradox of Life

Is Modi’s India Moving in the Right Direction?

Justice or Prejudice?: Diving into Gender-biased Laws in India